Sapre's -- Delight in Every Bite

Sapre’s is not just a name it is a tradition of homemade, tasty and mouth-watering Maharashtrian Snacks / food since 1984.


best in class ingridents used while making sncks by sapre foods

Best Ingredients

trained chefs making sapre foods

Traditional Recipes

advance machineries for hygiene and  processing snacks and packaging

Hygienic Processes

Authentic taste maintained by Sapre foods for all maharashtrian , indian and regional snack and food items

Authentic Taste

Sweets

See All


पारंपरिक पद्धतीने तयार केलेली गुळपोळी ही चवीला उत्तम त्याच बरोबर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. महाराष्ट्रामध्ये संक्रांतीला गूळपोळीचे फार महत्व आहे. थकवा, सांधे दुखी आणि हाडांसाठी ही गुणकारी आहे. Traditionally, Gulpoli is largely prepared by Maharashtrians during Makar Sankranti festival. The main ingredient used in making are sesame seeds and jaggery. It helps to keep body warm in winter and beneficial over fatigue, joint pain and bones. Shelf life of Gulpoli is actually 8 days; refrigerate it to extend.
गुलाब जामुन हे आटवलेल्या दुधापासून बनलेले एक भारतीय मिष्टान्न आहे. खोया व इतर जिन्नस वापरून बनविलेले सुंदर मऊ रसाळ गोड गुलाब जामुन सर्व सण, उत्सव आणि समारंभांसाठी एक परिपूर्ण मिष्टान्न आहेत. Gulab Jamun is milk-solid-based sweet from the Indian subcontinent. Lovely soft juicy sweet balls made up of khoya and other ingredients. A perfect dessert for all festivals and celebrations. Shelf Life of Gulabjam is 4-5 days, refrigerate it to extend.
म्हैसूरपाक हे म्हैसूर शहराचे खाद्यवैशिष्ट्य आहे. हा पदार्थ चण्याचे पीठ / बेसन आणि हायड्रोजनेटेड वनस्पती तेल वापरून तयार केला जातो . प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि इतर पौष्टिक घटकांनी समृद्ध असा हा पदार्थ सगळ्याच वयोगटांमध्ये प्रिय आहे. Mysore Pak is traditional sweet dish from the city of Mysuru, India. The sweet is made up with gram flour and hydrogenated vegetable oil. It is highly rich in protein, iron, magnesium, manganese and other minerals.
खुसखुशीत, मऊसूत, ताजी अस्सल मराठमोळी चवीची पुरणपोळी जिभेवर ठेवताच विरघळते. लहान थोर सगळ्यांची लाडकी पुरणपोळी साजूक तुपासोबत एक लाजवाब पक्वान्न आहे. कोणत्याही सण समारंभाला पुराणपोळीला नेहमीच पसंती असते. Soft, fresh authentic Maharashtrian delicacy - Puranpoli, that melts in your mouth. This is one of the flagship product of Sapre`s. A delightful combination of Puranpoli with pure ghee is everyone`s favorite and a special dish of any festival and celebrations. Shelf life of Puranpoli is actually 5 days; refrigerate it to extend.


Laddu

See All


दिवाळीच्या फराळातील एक अविभाज्य घटक म्हणजे बेसन लाडू. खमंग बेसन लाडू शरीराला अत्यंत गुणकारी आहेत. शरीरात आयर्न म्हणजे लोह बनायला तसेच पांढऱ्या आणि लाल पेशी निर्माण व्हायला हे लाडू खूप उपयोगी ठरतात. Besan Ladoo is an integral part of traditional Diwali Faral. Delicious Besan Ladu prove extremely beneficial to the body as these laddus are very useful in iron production in body as well as in the formation of red and white blood cell.
रवा लाडू हे रवा आणि साखर मिसळून बनवलेले मिष्टान्न आहे . दिवाळीच्या उत्सवात हे लाडू खास बनवले जातात. चहाच्या वेळी, सण - समारंभात, मंदिरात प्रसाद म्हणून हे लाडू देऊ शकता. Rava Laddus are made up of rava/ suji / semolina and sugar. These laddus are specially made during Diwali festival. Good snack for sweet lovers, served as dessert, tea time partner and can be offered as prashad in temples and gifted during ceremonies.
खजूर लाडू हा अतिशय चविष्ट खजूर पासून बनलेला गोड पदार्थ आहे. त्यात फायबर, लोह, पोटॅशियम, तांबे आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण जास्त आहे. या लाडूंमध्ये खजुराचा नैसर्गिक गोडपणा आहे आणि कोणत्याही वयोगटासाठी चांगला खाऊ आहे. Khajur Ladu is a wholesome snack made up of very healthy and tasty Khajur / Dates. It is high in fiber, iron, potassium, copper and other nutrients. It inherits the natural sweetness of dates. It is a perfect snack for any and every age group.
कुट लाडू / शेंगदाणा लाडू हे प्रथिने समृध्द असतात आणि यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते जे हृदयासाठी चांगले आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप आरोग्यदायी तसेच उपवासाला सुद्धा हे लाडू खाल्ले जातात . Kut Ladu / Peanut Laddu is rich in protein and it helps increase good cholesterol in body which is good for heart. Very healthy snack for all age groups as well as for people on fasting.


Chivda

See All


डाएट चिवडा हा फुलवलेले पोहे आणि शेव ह्याचे मिश्रण करून केलेला एक उत्तम पदार्थ आहे . कमीत कमी कॅलरीज असलेला हा एक हेल्दी पदार्थ इतर तेलकट बटाटा चिप्स, फ्राय इत्यादीं पदार्थाना एक उत्तम पर्याय आहे. डाएट चिवडा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा आहे . Diet Chivada is a mixed snack made up with puffed poha and sev. It contains fewer calories. It is a healthier alternative to conventional snacks such as potato chips, fries etc. It is Popular snack in every age groups.
फराळी चिवडा हा बटाट्या पासून बनवलेला एक नमकीन पदार्थ आहे. ह्याला उपवासाचा चिवडा म्हणून पण ओळखतात. हा चिवडा कर्बोहैड्रेट, आणि आयर्न म्हणजे लोह ह्यांचा उत्तम स्रोत आहे. Farali Chivda is a crunchy, sweet and salty dish made from potatoes. It is also known as fasting Chivda/ upvas chivda. This Farali chivda is a good source of carbohydrates and iron, keeping energy intact during fasting.
पोहा चिवडा हा खमंग कुरकुरीत नमकीन पदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यतः दिवाळीत फराळात ह्याचा समावेश असतो. पोहा हा आयर्न, कार्ब्स अँड व्हिटॅमिन बी ने संपूर्ण असा घटक आहे. पिकनिक, शाळेतला खाऊ आणि चहा सोबत टाईम पास म्हणून पोह्याचा चिवडा आवडीने खाल्ला जातो. Poha Chivda is a deliciously crunchy salty dish. In Maharashtra, it is mainly included in Diwali Faral. Poha is rich in Iron, Carbs and Vitamin B. Poha Chivda is a favorite passtime snack for picnics, school meals and with tea.
मकई चिवडा किंवा कॉर्न चिवडा हा फुलवून तळलेले कॉर्न फ्लेक्स पासून बनवला जातो. ह्या सुपर कुरकुरीत आणि सुपर चवदार पदार्थामध्ये उच्च लोह, प्रथिने आणि कमी ग्लूटेन असते. डायबेटिक व्यक्तीसाठी सर्वोत्कृष्ट स्नॅक्स आहे. Makyacha Chivda or Makai Chivada or Corn Chivada is made up of puffed & fried corn flakes. A crunchy and super tasty snack that contains high iron and protein and low at gluten, this is best for diabetic person.


Sev

See All


तिखट शेव हा मसालेदार आणि कुरकुरीत असा दिवाळीच्या फराळापैकी एक पदार्थ आहे. अत्यंत खमंग अशी ही शेव चहा सोबत, चाट रेसिपीचा एक भाग आणि गार्निशिंग साठी सुद्धा वापरता येतात. Tikhat Shev / Tikhi Sev is spicy and crunchy Diwali snack item. It is a tea time snack, part of chat recipes and a garnishing agent too.
पिवळी शेव हा दिवाळीच्या फराळातील एक कुरकुरीत आणि चवदार पदार्थ आहे. पिवळी शेव ही चहासोबत तसेच सुखा भेल, सेव पुरी सारख्या चाट रेसिपी मध्ये देखील वापरली जाते. उपमा, पोहे अशा भारतीय न्याहारीच्या पाककृतींच्या सजावटी साठी देखील वापरली जाते. Yellow Sev is crunchy and tasty snack item. This is one of the festival snack. It is a tea time snack, part of chaat recipes like sukha bhel, sev puri and a garnishing agent for Indian breakfast recipes like upama and poha.
लसूण शेव हा मसालेदार चवदार आणि कुरकुरीत पदार्थ आहे. दिवाळी फराळामधील एक पदार्थ म्हणजे लसूण शेव. चहा सोबत, गप्पा रंगलेल्या असताना आणि सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंकस सोबत हा आवडीने खाल्ला जातो . सर्व वयोगटातील लोकांना लसूण शेव आवडते. Lahsun Sev / Lasun Shev / Garlic Sev is spicy tasty and crunchy snack item. This is one of the festival snack. Favorite of all age groups, it goes well with tea, while chit chatting and in parties..


Shankarpale

See All


गोड शंकरपाळे हा एक कुरकुरीत, खुसखुशीत तळलेला पदार्थ आहे. असे हे गोड शंकरपाळे दिवाळी फराळाचा देखील एक भाग आहेत . चहा सोबत, मुलांच्या डब्यासाठी, पिकनिकसाठी चांगला पर्याय आहे. सगळ्या वयोगटाच्या लोकांचा हा आवडता पदार्थ आहे. Sweet Shankarpali is a crispy, crunchy fried snack. Tasty snack is part of Diwali faral too. Loved by all age groups, this snack is good to go with tea, as a picnic snack, kid`s tiffin and munching snack.
कुरकुरीत खारे शंकरपाळे सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. हा चहाचा सर्वोत्कृष्ट साथीदार आहे. चहा सोबत, मुलांच्या डब्यासाठी, पिकनिकसाठी चांगला पर्याय आहे. Salty / Namkeen Shankarpale is fried crunchy and salty snack liked by all age groups. This is best tea time partner, good for kids` tiffin as well as picnic snack.
मेथी शंकरपाळे कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ आहे. चवदार तळलेले मेथी शंकरपाळे मेथीच्या पाल्यापासून बनवलेले आहेत . याचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. Methi Shankarpali / Fenugreek Shankarpara is crunchy, namkeen snack. As name suggests, this tasty fried snack is made up with methi leaves. It is a healthy snack that reduces risk of diabetes and helps weight loss.
सँडविच शंकरपाळे कुरकुरीत आणि मसालेदार पदार्थ आहे. गोड, तिखट, मसालेदार असे हे सँडविच शंकरपाळे मुलांसाठी डब्या मध्ये, किटी पार्टीजसाठी, ड्रिंक्स पार्टीजसाठी आणि चहाच्या वेळी नाश्ता म्हणून एक उत्तम पदार्थ आहे Sandwich Shankarpale is crispy fried snack. It has mix taste - sweet, tangy, spicy and salty. Best for kids in tiffin, for kitty parties, drink parties and a tea time snack too. Enjoyed with different dips like green chutney, tomato ketchup and even with tangy chutney.


Snacks

See All


अस्सल महाराष्ट्रीयन भाजणी चकली खायला अगदी कुरकुरीत, खमंग, चविष्ट आहे. विविध डाळींनी युक्त अशी ही पौष्टिक चकली दिवाळीच्या फराळातील अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. The authentic Maharashtrian bhajani chakli is a crunchy, delicious and tasty snack. A nutritious chakli with various pulses is one of the main menu of Diwali faral. These chakalis last longer due to the well-roasted bhajani.
खारी बुंदी हा बेसनपासून बनवलेला एक कुरकुरीत नमकीन पदार्थ आहे. बुंदी रायता बनवण्यासाठी देखील यांचा उपयोग करू शकतो . तसेच कढी , जलजीरा, चाट आणि इतर अनेक पदार्थांमध्ये घालून त्यांची लज्जत वाढवता येते . Khari Bundi / Namkeen Bundi is deep fried snack made with besan. This crunchy snack can be added in curd for raita, curry, jaljeera, chats and many other dishes.
भाकरवडी हा एक तळलेला कुरकुरीत, खमंग, चटकदार पदार्थ आहे. भाकरवडी ही मसालेदार, गोड, आंबट आणि तिखट अशी मिक्स चवीची आहे . ही चहा सोबत, मुलांना खाऊच्या डब्यामध्ये आणि पिकनिक साठी ही उत्तम पर्याय आहे. Bakarvadi is a traditional crispy snack, popular in Maharashtra. Due to the mix taste - spicy, sweet, salty and tangy, it is favorite snack of all age groups. It is enjoyed as a tea time snack, kids love it in their tiffin, a great munching snack as well as on picnics.
केळा वेफर्स हा कच्च्या केळ्यांपासून बनवलेला कुरकुरीत पदार्थ आहे. प्रत्येक वयोगटाला आवडणारा हा पदार्थ मुलांच्या खाऊच्या डब्यामध्ये , चहा सोबत, पार्ट्यांमध्ये, पेयांसह आणि सहलीसाठी उत्तम आहे . उपवासात लोक हे खाणे अधिक पसंत करतात. Banana Wafer / Kela Wafer is a crunchy deep fried snack recipe made with raw banana. A favorite evening munching snack liked by every age groups, it goes well in kid`s tiffin, with tea, in parties, and for picnics. During fasting, this is one of the favorite and preferred snacks.


Chikki

See All


शेंगदाणा चिक्की/ पीनट चिक्की ही प्रथिने समृध्द असून यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते जे हृदयासाठी चांगले आहे. अख्ख्या शेंगदाण्याचा खुसखुशीतपणा ही चिक्की खाताना अनुभवता येतो. सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप आरोग्यदायी तसेच उपवासाला सुद्धा ही चिक्की खाल्ली जाते . Shengdana Chikki / Peanut Chikki is a crunchy and tasty energy bar. Rich in protein, it also helps increase good cholesterol in body which is beneficial for heart. Very healthy snack for all age groups as well as for people on fasting.
शेंगदाणा चिक्की/ पीनट चिक्की ही प्रथिने समृध्द असून यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते जे हृदयासाठी चांगले आहे. अख्ख्या शेंगदाण्याचा खुसखुशीतपणा ही चिक्की खाताना अनुभवता येतो. सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप आरोग्यदायी तसेच उपवासाला सुद्धा ही चिक्की खाल्ली जाते . Crush Chikki is made out of crushed Shengdana / Peanut. It is rich in protein and it helps increase good cholesterol in body which is beneficial for heart. Very healthy snack for all age groups as well as for people on fasting.
राजगीरा चिक्की या मध्ये फायबर अधिक असते आणि वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम पदार्थ आहे. राजगिरा हाडे, स्नायू आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहित करते. सर्व वयोगटातील आणि उपवासा साठी सर्वोत्तम आरोग्यदायी पदार्थ. Rajgira Chikki / Amaranth Chikki is high on fiber and best recommended for weight loss. It improves bones, muscles and heart health. Best healthy snack for all age groups and people on Fasting.
३ इन १ चिक्की हे शेंगदाणे, तीळ आणि राजगिराचे ह्याचे उत्तम कुरकुरीत मिश्रण आहे. फायबर आणि प्रथिने ह्यांनी युक्त असा हा पौष्टिक स्त्रोत प्रत्येक वयोगटासाठी योग्य आहे. 3 in 1 Chikki is a perfect crunchy combination of Groundnut, Sesame seed and Amaranth. A wholesome source of fiber, nutrition and protein, this is best suited for every age group as an energy bar.


Essentials

See All


भाजलेले शेंगदाणे कूट हे एक उत्तम प्रथिन स्त्रोत आहे. अनेक भारतीय पाककृतींमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. हे जेवणात, गोड पदार्थ बनवताना, कोशिंबिरीमध्ये वापरता येते.अनेक उपासाच्या पदार्थांमध्ये देखील याचा मुख्य घटक म्हणून वापर होतो Roasted Peanut Powder is a great protein source. It is used as an ingredient in many Indian recipes. It can be used in food preparations, sweets, salads and as toppings. Also it is used as an important ingredient in food consumed during fasting.
अनेक भारतीय पाककृतींमध्ये प्रमुख्याने वापरात येणारा घटक म्हणजे सुक्या नारळाचे भाजलेले खोबरे. ह्याला जेवणात, कोशिंबीरी, कोंकणी जेवणाचे पदार्थ, मिठाईं -लाडू आणि मसालेदार पदार्थां मध्ये वापरता येते. घट्ट दाट रस्सा बनव्यासाठी याचा खास वापर केला जातो Roasted coconut flakes is one of the delicious ingredient of many Indian recipes. It can be added as toppings on cereals, salads, konkani delicacies, sweets like ladoos and spicy dishes as well. Can also be used to make thick gravy.
थालीपीठ हे महाराष्ट्राचे पारंपरिक खाद्यवैशिष्ट्य आहे. खुसखुशीत, चवदार आणि सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा अतिशय पौष्टिक आणि खमंग पदार्थ. तयार थालीपीठ भाजणी बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार तिखट व मीठ आणि पाणी घालून मळून घ्यावी आणि त्याचे लहान गोळे बनवावे . नंतर हे थापून घ्यावे व तव्यावर तेल / तूप वापरुन भाजून घ्यावे. दही किंवा लोण्या सोबत खावे. Thalipeeth is traditional dish of Maharashtra. Crispy, tasty & very healthy authentic breakfast menu loved by all age groups. We offer ready bhajani ( where you have to add chopped onion, chili powder, salt and water to kneed a dough, and make small balls. These balls are then flattened with hands in roti form. Brown-roast on pan using oil / ghee and serve it hot. Enjoyed best when served with fresh curd or butter.
उपवास भाजणी थालीपीठ हे उपवास करणाऱ्यांसाठी तसेच इतरांसाठी पण उत्तम खाद्यपदार्थ आहे. भाजाणी चे चवदार आणि कुरकुरीत थालीपीठ बनविणे सोपे आहे. भाजणी घेऊन त्यात पिकलेली केळी किंवा गूळ मिसळा,शेंगदाण्याचे कूट , मिरची आणि चवीनुसार मीठ घाला. लहान गोळे बनवून थापून घ्या आणि तव्यावर भाजून घ्या. Upwas Bhajani is known as Fasting Bhajani and famous among fasting people. Its tasty and crunchy and an easy to make snack. Mix our bhajani with ripe banana or with jaggery and add Sapre`s shengdana powder, some chilli and salt to taste. Make small balls and flatten with hands to form rotis and brown-roast on pan in ghee or oil.


Combo Packs

See All


दिवाळी टेस्टर पॅक ज्यात आहेत १० प्रकारचे खमंग स्वादिष्ट, चविष्ट खास महाराष्ट्रीयन दिवाळी फराळ पदार्थ. हा पॅक घ्या पदार्थांची चव बघा तुम्हाला नक्कीच आवडणार ह्याची खात्री. आम्ही तयार आहोतच तुमची दिवाळी फराळाची ऑर्डर घ्यायला. Diwali Taster Pack/ Diwali Faral which contains 10 types of delicious, tasty Maharashtrian Diwali Faral items. Take this pack and we are sure you will love it all. Order Diwali Faral Online From Sapre`s / Sapre Foods Now!
गोड आणि तिखट पदार्थांची मेजवानी म्हणजे स्टार्टर पॅक. खमंग, खुसखूषीत, चविष्ट असे विविध तयार पदार्थ जे चहा कॉफी सोबत, गप्पा गोष्टी, लहान मुलांचा खाऊ आणि काम करता करता सहज खाल्ले जातात. A Starter Pack is a feast of sweets and spicy snacks. Crunchy, delicious delicacies that are easily eaten with tea, coffee, Chit chatting , tiffin for kids and even while at work.
उपवासाला काय खाऊ हा प्रश्न पडणाऱ्या प्रत्येकासाठी खास उपवास पॅक. ज्यात आहेत उपवासावेळी खाल्ले जाणारे ५ पदार्थ जे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतात. Upvas Pack / Upvas Padarth Pack is a combo of five fasting snacks. Healthy snack items keeps you energetic entire day.
खमंग खुसखुशीत दिवाळी फराळ पॅक खास आपल्या फॅमिली साठी. दिवाळी निमित्त एक हेल्थी आणि चविष्ट असा दिवाळी फराळ फॅमिली पॅक. दिवाळी भेट म्हणून हा पॅक एक उत्तम पर्याय. Delicious Diwali Faral Pack especially for your family. A healthy and tasty Diwali Faral Family Pack for Diwali. This pack is a great option as a Diwali gift too. Khamang Besan Ladu 200 g Dried coconut curry 200 g Crispy Bhajani Chakli 200 g Sweet Shankarpali 200 g Poha Chivda 200 g Tikhi Shev 200 g


Modak

See All


गणपती उत्सवासाठी सप्रेंचे खास बेसन मोदक. मावा/खवा विरहित असल्याने हे मोदक जास्त दिवस टिकतात. Sapre`s special--Besan modak specially made for Ganesh festival.
गणपती उत्सवासाठी सप्रेंचे खास (मावा/खवा विरहित)ड्रायफ्रूट मोतीचूर मोदक. Sapre`s special- Dryfruit Motichoor Modak specially made for Ganesh festival
गणपती उत्सवासाठी सप्रेंचे खास ओल्या खोबऱ्याचे (मावा/खवा विरहित) मोदक. Sapre`s special- Fresh Coconut Modak specially made for Ganesh festival.
गणपती उत्सवासाठी सप्रेंचे खास (मावा/खवा विरहित)ड्रायफ्रूट मोतीचूर मोदक. Sapre`s special- Dryfruit Motichoor Modak specially made for Ganesh festival.


FAQ

We sell on our official website https://www.saprefoods.com/, through our order taking app, and also our products are available through shops.

Your ordered products are freshly made and we typically ship within 24 working hours. Generally which is 2 to 3 days depending on location. Once you place an order you will receive an e-mail and a text message where you can track your order processing. 

We Deliver FREE in the Mumbai region.

Shipping charges are calculated at your checkout automatically depending upon the weight of items you have selected and location. This will get added to your checkout total and shown separately.

Yes, definitely we do ship to New Delhi and in fact across the entire India.

Yes, we definitely ship to USA and even to Australia, Canada, UAE, New Zealand, South Africa, and the United Kingdom. 

Different products have a different shelf life and they are mentioned in our product details.

Testimonial


Blogs

श्रावणी सोमवाराचे व्रत का आणि कसे करावे ?

General
Aug 05, 2022
सप्रे फूड्स

श्रावण हा हिंदू कॅलेंडरचा पाचवा महिना आहे.  जो जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात, पुढील पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होतो.


या काळात साजरे होणाऱ्या असंख्य सणांमुळे श्रावण हा हिंदू कॅलेंडरमध्ये एक पवित्र महिना मानला जातो.


श्रावण मास हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी अतिशय शुभ मानला जातो आणि त्यापैकी जवळजवळ प्रत्येकजण एकतर संपूर्ण महिना किंवा किमान श्रावण मासच्या प्रत्येक सोमवारी उपवास करतो.

श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते. 


श्रावण महिन्यात सकाळी लवकर स्नान करून रुद्राक्ष माळांनी नऊ किंवा एकशे आठ वेळा "ओम नमः शिवाय" चा जप केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.

- या संपूर्ण महिन्यात उपवास करणे खूप शुभ मानले जाते. सकाळी लवकर उठून शिवमंदिरात जाणे आणि दूध, तूप, दही, गंगाजल आणि मध यांचे मिश्रण ज्याला पंचामृत म्हणतात आणि त्याबरोबर बिल्वाच्या पानांचा प्रसाद घेणे आवश्यक आहे.

या वेळी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि उपवासासाठी मान्यताप्राप्त इतर पदार्थ असू शकतात.

- अविवाहित स्त्रिया ज्या चांगल्या पतीच्या शोधात आहेत त्यांना श्रावणी सोमवार उपवास आवर्जून करण्यास सांगितले जाते.


- हिंदू पौराणिक कथेनुसार, वर्षातील इतर कोणत्याही वेळेपेक्षा या वेळी शिवाची पूजा करणे 108 पट अधिक शक्तिशाली मानले जाते.


- या काळात उपवास करणार्‍यांना संसाराला सुख-समृद्धीही प्राप्त होते.


- श्रावणात 'एक भुक्त' भोजनाचे पालन करणे किंवा दिवसातून एकच जेवण घेणे किंवा 'नख्त व्रतम' म्हणजेच दिवसा उपवास करणे आणि रात्री प्रसाद किंवा फळे घेणे हे अत्यंत फलदायी आणि पुण्यकारक आहे.


श्रावण महिन्यातील सर्व मंगळवार देवी पार्वतीला समर्पित असतात. द्रिक पंचांगानुसार, सावन महिन्यात मंगळवारी व्रत करणे याला मंगळ गौरी व्रत असे म्हणतात.


याव्यतिरिक्त, श्रावण महिन्यात 'श्रावण शिवरात्री' आणि 'हरियाली अमावस्या' हे इतर शुभ दिवस आहेत.


श्रावणी सोमवार उपवासासाठी सप्रेंनी खास उपवास कॉम्बो पॅक बनवला आहे. ह्या पॅक मध्ये उपवासासाठी खास आणि पारंपारिक खाऊ पदार्थ आहेत.


प्रवासात नेण्यास सोप्पे आणि पौष्टिक पदार्थ तसेच खमंग थालीपीठ भाजणी इ. उपवास मेनू उपलब्ध आहेत.
कूट लाडू, डिंक लाडू आणि ड्रायफ्रूट खजूर लाडू यासारखे अत्यंत चविष्ट आणि उपवासात पौष्टिक असे लाडू प्रवासात, ऑफिसला तसेच कोणत्याही वेळेला आणि कुठेही सोबत नेण्यास आणि खाण्यास एक योग्य पर्याय मानला जाऊ शकतो.


विविध प्रकारच्या चिक्की जसे की शेंगदाणा चिक्की, राजगिरा चिक्की, शेंगदाणा कूट चिक्की / क्रश चिक्की हे सुद्धा उपवासासाठी एक उत्तम पर्याय आहे.


श्रावणी उपवासासाठी लागणारा खास मेनू आणि कॉम्बो पॅक आजच घरबसल्या ऑर्डर करा आणि मोफत डिलिव्हरी मिळवा.

तुमच्या जवळच्या दुकानांना भेट देऊन हि तुम्ही तुमचे आवडते महाराष्ट्रयीन खाद्यपदार्थ विकत घेऊ शकता.
आमच्या दुकानांबद्दल अधिक माहित साठी खालील लिंक वर क्लिक करा .
सप्रे शॉप्स 

आषाढी एकादशीचे महत्व!

General
Jul 07, 2022
सप्रे फूड्स

“चैतन्याचा गाभा…विटेवर उभा

पालख्यांचा सोहळा नाही..वारकऱ्यांचा मेळा नाही

मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान

मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा

रखूमाईवर

उभा विटेवर

कर कटेवर ठेऊनिया भगवंता,

तव तेज ह्या तिमिरात दे आता”


टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…!आषाढी एकादशीचे महत्त्व


आषाढ महिन्यात दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी.

त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची आणि पूज्य मानली जाते.


धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. पुराणानुसार असे मानले जाते की आषाढी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने योगनिद्रात जातात.

या दिवशी उपासना आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. 

पण वर्षातील या एकादशीला एक विशेष ओळख आहे. हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. आषाढी एकादशीला भगवान विष्णूची आराधना आणि उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

या एकादशी निमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच "आषाढी वारी" म्हणतात.


आषाढी एकादशीचा उपवास 


एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहायचे असते. एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे.

हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. ह्या उपवासात अल्पोपहार घेणे नेहमी योग्य. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात निरंकार उपवास करणे सर्वांनाच जमतं असं नाही. अश्या वेळेला झटपट आणि भूक तृप्त होईल असे पदार्थ करावे. जसेकी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, परंतु ह्यासाठी लागणारा वेळ पाहता ह्या पारंपारिक पदार्थांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. म्हणून रेडी शेंगदाणा कूट वापरून हे पदार्थ झटपट रेडी होतात. ऑर्डर करण्यासाठी क्लिक करा.

पंढरीची वारी परंपरा 


पूर्वी जातीय व्यवस्थेवर आधारित असे भक्तांचे समूह केले जात आणि त्यांना विशिष्ट क्रमांक दिले जात. त्या समूहांना ‘दिंडी’ असे म्हणतात. या सोहळयात सहभागी होणारे भक्तजन आपापल्या दिंडीत एकत्र राहून पंढरपूरपर्यंत पायीपायी चालत जातात. आता मात्र नव्या दिंडया जातीय व्यवस्थेवर आधारित नाहीत. 


प्रत्येक दिंडीचा प्रमुख एक ‘वीणेकरी’ असतो. वीणेकरी म्हणजे ज्याच्या गळयात वीणा असते तो. एका दिंडीला एकच "वीणेकरी" असतो. वीणेक-यानंतर टाळकरींचा मान असतो.


प्रत्येक दिंडीचे ५ ते १० पर्यंत ध्वज असतात. ते ध्वज कावेने रंगविलेले असतात. दिंडीमध्ये प्रामुख्याने बहुजन समाज, शेतकरी वर्ग आणि आजकाल सुखवस्तू पांढरपेषा लोकही थोडयाबहुत संख्येने सामील होतात. स्त्री-पुरुष , काहीवेळा अख्खे कुटुंबच्या कुटुंबही दिंडीत सहभागी होते. साधारणत: धोतर किंवा पायजमा, सदरा,गांधी टोपी असा पुरुषांचा तर नऊवारी साडया असा स्त्रीयांचा पोषाख असतो.

ज्या स्त्रिया काही नवस बोललेल्या असतात त्या नवस फेडण्यासाठी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत जातात. कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिळा, हातात झांजा किंवा एकतारी, गळयात तुळशीच्या माळा, मुखी विठ्ठलाचे नाम, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामांचे अभंग, भक्तीरसात न्हालेले मन आणि ऊन-पाऊस-वादळ-वारा यांना न जुमानता विठुरायाच्या ओढीने पायी अंतर पार करण्यासाठी आसुसलेली पावले असे हे जनताजनार्दनाचे रुपडे असते.


विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवायचा असतो. यादिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी तर उपवासासहित विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात.

आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणो सोडायचे. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधीही करण्यात येतो. 


‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते,

कोण बोलविते हरीविण,

देखवी दाखवी एक नारायण,

तयाचे भजन चुको नका’


या समर्पक ओवीच्या आविर्भावात चेह-यावर प्रवासाचा शीण जराही उमटू न देता वारकरी दिंडीबरोबर चालत रहातात. पंढरपूर येथे गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे मनोभावाने दर्शन घेतात. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या वारीचे सार्थक आणि पुण्य पदरात पडल्याचे समाधान मिळवायचे असते.


पंढरपूरच्या मंदिरात आणि आसपासच्या परिसरात माणसांचा महापूर लोटतो. बहुधा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठोबा-रखुमाईची महापूजा होते. विठ्ठलाच्या आरतीने पूजेची सांगता होते. या आरतीत एकादशीच्या सोहळयाचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे. दिवसभर हा परिसर भजन – कीर्तनाने दुमदुमून निघतो. चंद्रभागेचे वाळवंट भक्तांनी फुलून येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे आणि घराघरातील लहान ते मोठया वयातील व्यक्ती या आषाडी एकादशी चा उपवास करतात.


या आषाडी निमित्त महाराष्ट्रसह विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरास येतात. जसे कि पैठणहून एकनाथांची पालखी, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पालखी, देहूहून तुकारामांची आणि आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी हि पंढरपुरास येत असते.

शेगाव या ठिकाणावरून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी हि पंढरपुरास रवाना होते. उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.


आषाढी एकादशीनिमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात, स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी या एकादशी स देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हंटले जाते. आषाढी एकादशीला दिंडी यात्रा निघते महाराष्ट्र हे अनेक थोर संतांचे कार्यस्थान आहे. या संतांच्या जन्म किंवा समाधीस्थळावरून या पालख्या आणि दिंड्या निघतात, त्या पंढरपूरला जाण्यासाठी लांबचा प्रवास करतात.


चातुर्मास


चातुर्मास हा ४ महिन्यांचा कालावधी आहे, जो आषाढ शुक्ल एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चालतो. चार महिने व्रत, भक्ती आणि शुभकर्मांना हिंदू धर्मात ‘चातुर्मास’ म्हणतात. जे लोक ध्यान करतात आणि आध्यात्मिक साधना करतात त्यांच्यासाठी हे महिने महत्त्वाचे आहेत. या दरम्यान केवळ शारीरिक आणि मानसिक स्थितीच नाही तर वातावरणही चांगले राहते.

बाबा: मुलाचा पहिला नायक, मुलीचे पहिले प्रेम.!

General
Jun 16, 2022
sapre foods

फादर्स डे हा वडील, भाऊ, काका किंवा तुमच्या आयुष्यातील कोणत्याही महत्त्वाच्या पुरुष व्यक्तीचा सन्मान करण्याचा दिवस आहे.


आपल्या वडिलांनी आणि घरातील पुरुष व्यक्तींनी आपल्या आयुष्यात केलेले त्याग आणि योगदान आपण अनेकदा विसरतो.


फादर्स डे आपल्याला या खास लोकांप्रती आपले प्रेम, आराधना आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो.


फादर्स डे वर, या पात्र पुरुषांना तुमच्या जीवनात त्यांचे विशेष स्थान आहे आणि त्यांचा तुमच्यावर काय प्रभाव आहे हे दाखवता येते.


वडील आणि वडिलांनी त्यांच्या मुलांच्या जीवनात केलेले योगदान ओळखण्यासाठी जगभरात फादर्स डे साजरा केला जातो. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की वडिलांच्या सन्मानार्थ एक दिवस पाळण्याच्या कल्पनेचे भारतीयांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे.


भारतातील लाखो लोक जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे पाळतात आणि त्यांच्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. अशा कार्यक्रमांमागील संकल्पना मुलांना त्यांच्या वडिलांचा आदर करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी प्रेरित करणे आहे.Fathers Day by Sapre's

pic credit by - master1305वडिलांना त्यांच्या मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये उदात्त मूल्ये आणि शिष्टाचार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.


पितृत्व साजरे करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष दिवसाची कल्पना प्रथम युनायटेड स्टेट्समध्ये मांडण्यात आली.


यूएस मध्ये, फादर्स डे जून 1910 पासून साजरा केला जातो. हा एक दिवस आहे जो वडिलांच्या योगदानाची आणि त्याने आपल्या मुलासाठी केलेल्या त्यागांची प्रशंसा करण्यात अभिमान बाळगतो.


अनेकदा, वडील जे त्याग करतात त्याकडे लक्ष दिले जात नाही, आणि बरेचदा त्याचे आपल्या मुलासाठीचे प्रेम आणि काळजी याकडे दुर्लक्ष केले जाते आणि समाजाकडून त्याची कदर केली जात नाही.


आम्ही त्या सर्व अद्भुत वडिलांना वंदन करतो ज्यांनी अनेक लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे, मग ते त्यांची स्वतःची मुले असोत, इतर कोणाची तरी मुले असोत, कुटुंब असोत, त्यांनी मार्गदर्शन केलेले लोक असोत, त्यांनी प्रशिक्षित केलेले लोक आणि संपूर्ण जग असो. महान वडील असल्याबद्दल धन्यवाद.


आम्ही तुमचे अस्तित्व आणि आमच्या जीवनात तुम्ही बजावलेल्या प्रभावी आणि महत्त्वपूर्ण भूमिकेची प्रशंसा करतो.Fathers Day by Sapre's
बाप ही अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनात तुमच्या पद्धतीने प्रयोग करू देते आणि तुम्ही पडल्यावर तुम्हाला वर खेचता. तो तुम्हाला त्याच्यावर रागावू देतो आणि त्यानंतर तुमच्यावर अधिक प्रेम करतो. तो तुम्हाला गोष्टी तुमच्या स्वतःच्या मार्गाने पाहू देतो आणि नंतर त्याचा दृष्टिकोन देतो. नेहमी तुमच्यासोबत असतो, विशेषत: जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते.


आपल्या कुटुंबाला सर्वस्व देणाऱ्या वडिलांचा सन्मान करूया.


आणि बाबांच्या आवडीचे चमचमीत तसेच गोडाचे पदार्थ www.saprefoods.com ऑनलाईन ऑर्डर करा आणि गप्पांसोबत नाती आणखी घट्ट आणि मजबूत करा.


सप्रेंचे शुद्ध तुपातील लाडू तसेच नमकीन पदार्थ चिवडा, शेव, बाकरवडी आणि बरेच काही ऑर्डर करा आणि मोफत डिलिव्हरी मिळवा.
call-banner

if you have any question please call us

9808 044 044

Login

forgot password?