सप्रे फुड्स मध्ये एक गोष्ट खूपच आवडली ती म्हणजे आपली मराठमोळी खाद्यपरंपरा जपताना त्यांनी आधुनिकतेशीही नातं जोडलं आहे.त्यामुळे इथले मोदक तर मला आवडलेच पण त्याबरोबर कोथिंबीर वडी रॅप ही डिशही खूपच आवडली.सप्रेंची चकली, नारळाची वडी, नारळाची करंजी सगळ्याच पदार्थांची चव अप्रतिम आहे.म्हणूनच मराठमोळे सण साजरे करण्यासाठी जोडीला सप्रे फूड असतील तर मग बहारच येते.