भाजलेले शेंगदाणे कूट हे एक उत्तम प्रथिन स्त्रोत आहे. अनेक भारतीय पाककृतींमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. हे जेवणात, गोड पदार्थ बनवताना, कोशिंबिरीमध्ये वापरता येते.अनेक उपासाच्या पदार्थांमध्ये देखील याचा मुख्य घटक म्हणून वापर होतो Roasted Peanut Powder is a great protein source. It is used as an ingredient in many Indian recipes. It can be used in food preparations, sweets, salads and as toppings. Also it is used as an important ingredient in food consumed during fasting.

अनेक भारतीय पाककृतींमध्ये प्रमुख्याने वापरात येणारा घटक म्हणजे सुक्या नारळाचे भाजलेले खोबरे. ह्याला जेवणात, कोशिंबीरी, कोंकणी जेवणाचे पदार्थ, मिठाईं -लाडू आणि मसालेदार पदार्थां मध्ये वापरता येते. घट्ट दाट रस्सा बनव्यासाठी याचा खास वापर केला जातो Roasted coconut flakes is one of the delicious ingredient of many Indian recipes. It can be added as toppings on cereals, salads, konkani delicacies, sweets like ladoos and spicy dishes as well. Can also be used to make thick gravy.

थालीपीठ हे महाराष्ट्राचे पारंपरिक खाद्यवैशिष्ट्य आहे. खुसखुशीत, चवदार आणि सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा अतिशय पौष्टिक आणि खमंग पदार्थ. तयार थालीपीठ भाजणी बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार तिखट व मीठ आणि पाणी घालून मळून घ्यावी आणि त्याचे लहान गोळे बनवावे . नंतर हे थापून घ्यावे व तव्यावर तेल / तूप वापरुन भाजून घ्यावे. दही किंवा लोण्या सोबत खावे. Thalipeeth is traditional dish of Maharashtra. Crispy, tasty & very healthy authentic breakfast menu loved by all age groups. We offer ready bhajani ( where you have to add chopped onion, chili powder, salt and water to kneed a dough, and make small balls. These balls are then flattened with hands in roti form. Brown-roast on pan using oil / ghee and serve it hot. Enjoyed best when served with fresh curd or butter.

उपवास भाजणी थालीपीठ हे उपवास करणाऱ्यांसाठी तसेच इतरांसाठी पण उत्तम खाद्यपदार्थ आहे. भाजाणी चे चवदार आणि कुरकुरीत थालीपीठ बनविणे सोपे आहे. भाजणी घेऊन त्यात पिकलेली केळी किंवा गूळ मिसळा,शेंगदाण्याचे कूट , मिरची आणि चवीनुसार मीठ घाला. लहान गोळे बनवून थापून घ्या आणि तव्यावर भाजून घ्या. Upwas Bhajani is known as Fasting Bhajani and famous among fasting people. Its tasty and crunchy and an easy to make snack. Mix our bhajani with ripe banana or with jaggery and add Sapre`s shengdana powder, some chilli and salt to taste. Make small balls and flatten with hands to form rotis and brown-roast on pan in ghee or oil.

Login

forgot password?