दिवाळीच्या फराळातील एक अविभाज्य घटक म्हणजे बेसन लाडू. खमंग बेसन लाडू शरीराला अत्यंत गुणकारी आहेत. शरीरात आयर्न म्हणजे लोह बनायला तसेच पांढऱ्या आणि लाल पेशी निर्माण व्हायला हे लाडू खूप उपयोगी ठरतात. Besan Ladu is an integral part of traditional Diwali Faral. Delicious Besan Ladu prove extremely beneficial to the body as these laddus are very useful in iron production in body as well as in the formation of red and white blood cell.

रवा लाडू हे रवा आणि साखर मिसळून बनवलेले मिष्टान्न आहे . दिवाळीच्या उत्सवात हे लाडू खास बनवले जातात. चहाच्या वेळी, सण - समारंभात, मंदिरात प्रसाद म्हणून हे लाडू देऊ शकता. Rava Laddus are made up of rava/ suji / semolina and sugar. These laddus are specially made during Diwali festival. Good snack for sweet lovers, served as dessert, tea time partner and can be offered as prashad in temples and gifted during ceremonies.

खजूर लाडू हा अतिशय चविष्ट खजूर पासून बनलेला गोड पदार्थ आहे. त्यात फायबर, लोह, पोटॅशियम, तांबे आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण जास्त आहे. या लाडूंमध्ये खजुराचा नैसर्गिक गोडपणा आहे आणि कोणत्याही वयोगटासाठी चांगला खाऊ आहे. Khajoor Laddu is a wholesome snack made up of very healthy and tasty Khajoor / Dates. It is high in fiber, iron, potassium, copper and other nutrients. It inherits the natural sweetness of dates. It is a perfect snack for any and every age group.

कुट लाडू / शेंगदाणा लाडू हे प्रथिने समृध्द असतात आणि यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते जे हृदयासाठी चांगले आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप आरोग्यदायी तसेच उपवासाला सुद्धा हे लाडू खाल्ले जातात . Kut Ladu / Peanut Ladu is rich in protein and it helps increase good cholesterol in body which is good for heart. Very healthy snack for all age groups as well as for people on fasting.

मुग लाडू अत्यांत पौष्टिक आहेत. लहान मुलाांच्या वाढीला, प्रौढांना तसेच वयस्क लोकांच्या तब्ब्येतीसाठी हे लाडू फारच उत्तम आहेत.. Mung ladu is highly nutritious sweet. These ladus are very useful for the growth of children and beneficial for adults as well.

ग्लूटेन फ्री पौष्टिक नाचणी लाडू वजन कमी करण्यासाठी तसेच मधुमेहींसाठी अत्यंत गुणकारी पदार्थ आहे. नाचणी हा कॅल्शियम चा उत्कृष्ट स्रोत आहे सप्रे येथे नाचणी लाडू बनवताना ह्यात वापरली जाणारी नाचणी आम्ही विशिष्ठ पद्धतीने दळून घेतो आणि नंतर ती खमंग भाजून त्याचे लाडू वळले जातात. This nutritious and gluten free Nachani Ladu/ Ragi Ladu is highly beneficial for weight loss as well as for diabetics. Nachani is very rich source of calcium, helping to strengthen the bones.

तोंडात टाकताच विरघळणारे मेथी लाडू अगदी खमंग लागतात. सांधेदुखी, कंबरदुखी असल्या आजारांवर हे लाडू खूप गुणकारी आहेत. Fenugreek ladu, (Methi Ladu) which melts in the mouth, is deliciously tasty sweet. These ladus are very effective in treating health issues like joint and back pain.

शक्तिवर्धक डिंक लाडू हे कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम चा भरपूर स्रोत आहेत जे तुमच्या हाडांना मजबूती देतात. लहान मुले, प्रौढ आणि बाळंतीण स्त्रिया ह्यांच्यासाठी हे लाडू खूपच फायदेशीर ठरतात. हे लाडू 2 महिन्या पर्यंत टिकतात. Healthy and nutritious Dink (edible gum) Ladu is a rich source of calcium and magnesium which strengthens the bones. This ladu is beneficial for children, adults and postnatal/lactating women. These ladus last up to 2 months.

नावा प्रमाणे पौष्टिक लाडू हा शरीरासाठी अत्यन्त लाभदायी पदार्थ आहे. सगळ्या वयोगटाांसाठी अगदी उत्कृष्ट पदार्थ आहे. मुलाांना खाऊच्या डब्यामध्ये , तरुण व्यक्ती, वयस्क व्यक्तीांना सकाळ/सांध्याकाळच्या नाश्त्त्यासाठी साठी उत्तम पर्याय आहे. As the name itself suggests, Paushtik Ladus are pack of nutrition and it is a highly recommended healthy snack for all age groups.

पंचडाळ लाडू हे प्रथिन्यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. चविष्ट पंचडाळ लाडू पौष्टिक आणि रक्ताभिसरण वाढविण्यास लाभदायक ठरतात. हे पाच वेगवेगळ्या डाळींपासून बनवले जातात. सप्रे मध्ये चणा डाळ, मूगडाळ, तूरडाळ , उडदडाळ आणि मसूरडाळ ह्या पाच मुख्य डाळी भाजून नंतर बारीक पीठ बनवतात व ते परत शुद्ध तूपात खमंग भाजून साखर व वेलची पूड एकत्र करून लाडू तयार होतात Panchdal Ladu is very rich source of protein. Delicious and nutritious Panchdal Ladu are good for boosting blood circulation. It is made using five different split lentils.

मल्टीग्रेन लाडू हा एक असा पदार्थ आहे जो संपूर्ण पोषणयुक्त आहे. शुगरफ्री पौष्टिक मल्टीग्रेन लाडू सर्व वयोगटांसाठी अगदी उत्तम ठरतात. हे लाडू कडधान्याचे पीठ आणि गुळ घालून बनवले जातात Multigrain Ladu is an ideal snack loaded with nutrients. Healthy package of sugar free ladu is perfect for all age groups, especially for diabetics.

लग्नकार्याची गोडी वाढवणारा मोतीचूर लाडू हा सर्व वयोगटातील लोकांचा आवडता पदार्थ आहे .विविध समारंभ आणि सणांचा गोडवा वाढविणारा हा एक उत्तम पदार्थ आणि एक मधुर भेटवस्तू आहे. Motichoor ladu is a wonderful sweet dish and perfect gift that enhances the sweetness of various ceremonies and festivals. The shelf life of Motichoor Ladu is 8 days, keep it in the fridge to extend

ज्वारी आणि बाजरी हे ग्लूटेन मुक्त धान्य आहे. ज्वारी-बाजरी लाडू हे पोषण आहाराचे खूप चांगले स्रोत आहेत. सर्व वयोगटातील लोक या पौष्टिक गोड लाडूचा आनंद घेऊ शकतात. Jwari and Bajari are the gluten free whole grains. Jwari-Bajari Ladu is a very good source of Nutrition. All age groups can enjoy these nutritious sweet ladu.

राजगीरा लाडू / अमरंथ लाडू या मध्ये फायबर अधिक असते आणि वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम पदार्थ आहे. राजगिरा हाडे, स्नायू आणि हृदयाच्या आरोग्यास उपायकारक आहे . सर्व वयोगटातील लोकांसाठी आणि उपवासा साठी सर्वोत्तम आरोग्यदायी पदार्थ. Rajgira Ladu/ Amaranth Ladu are high on fiber and best for weight loss. They strengthen bones, muscles and improves heart health. Best healthy snack for all age groups and people on fasting.

कुरमुरा लाडू / मुरमुरा लाडू कमी कॅलरीज आणि अतिरिक्त जीवनसत्त्वे आणि खनिजे ह्याने समृद्ध आहेत. हा गोड पदार्थ केवळ भूक भागवत नाही तर त्वरित ऊर्जा प्रदान करतो . मुले आणि प्रौढांसाठी फार योग्य पदार्थ आहे. Kurmura ladu / Murmura ladu are low in calories and enriched with extra vitamins and minerals. This Sweet Snack not only fulfills the craving but provides a quick burst of energy. Good for kids and hard working people.

Login

forgot password?